ताज्या बातम्यारणधुमाळी
शरद पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; चर्चांना उधाण

मुंबई : सध्या राज्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे केंद्रीय तपास यंत्रणांनी राज्यातील काही मंत्री, सत्ताधारी आघाडीतील काही नेतेमंडळींच्या घरांवर धाडी टाकल्यामुळे राजकीय तणाव निर्माण झालेला असताना दुसरीकडे राज ठाकरेंच्या सभांमुळे देखील वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.
शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन तब्बल दीड तास चर्चा केल्याचं वृत्त टीव्ही ९ नं दिलं आहे. तसंच आज अचानक शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.