ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

फडणवीसांची नाराजी उघड! स्वागताच्या बॅनरवरून अमित शहांचा फोटो गायब!

नागपूर : (Amit Shah’s photo disappears from welcome banner) मागील १५ दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर महाराष्ट्रात बंडखोर एकनाथ शिंदे गटानं भाजपच्या मदतीनं महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. सोमवारी दि. ०४ जुलै रोजी नव्या सरकारनं विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. या सर्व घडामोडीत देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तेच होणार नाही अशी चर्चा रंगत होती. मात्र, ऐनवेळी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं.

दरम्यान यामुळं महाराष्ट्र भाजपमध्ये आणि विशेष करुन, फडणवीस समर्थकांत नाराजी समोर येत आहे. या नाराजीचं दुसरं सत्र आज पुन्हा एकदा नागपुरात पाहायला मिळालं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचं विमानतळावर जल्लोषात स्वागत झालं. त्यानंतर रोड शो देखील काढण्यात आला. या रोड शोमध्ये फडणवीसांनी सर्वांचे आभार मानले.

मात्र, फडणवीसांच्या स्वागताचे जे बॅनर लावले होते, त्यामधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो गायब होता. त्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित होतं. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून अचानक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रादाची संधी देण्यात आली. त्यामुळे फडणवीस उपमुख्यमंत्री पद घेण्याचे आदेश पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आले. खुद्द अमित शहा यांनी दोन वेळा फडणवीसांना फोन केल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर पक्षादेश मानत फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळं त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये