ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

चंद्रकांत पाटील म्हणाले, मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलं, यावर शरद पवारांची खोचक प्रतिक्रिया

पुणे : (Sharad Pawar On Chandrakant Patil) शुक्रवार दि. 22 रोजी बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेसंदर्भात उद्धव ठाकरेंवर आरोप केले होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेश भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचं वक्तव्य केलं. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार यावर पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं असता दगड छातीवर ठेवायचा की डोक्यावर ठेवायचा हा त्यांचा प्रश्न असल्याचं म्हणत भाजपला टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांसोबत संवाद साधला.

तर बंडखोर कांदे यांनी केलेल्या आरोपावर पवार म्हणाले, सुरक्षा कुणाला द्यायची याची चर्चा कॅबिनेटमध्ये होत नाही. मुख्य सचिव, गृहसचिव, डीजी होम या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती असते. त्यांच्या बैठकीत याबाबत निर्णय होतो. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला सांगितलं की त्यांना झेड दर्जाची सुरक्षा होती. गडचिरोलीचे पालकमंत्री असल्यानं त्यांना अधिकची सुरक्षा दिली होती, असंही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितल्याची माहिती दिली असं ते म्हणाले.

नितेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपाबद्दल माध्यमांनी विचारलं असता, शरद पवारांनी पोराबाळांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देण योग्य नाही, असा खोजक टोला लगावला. डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये