अर्थताज्या बातम्याशेत -शिवार

भारतात फळांचे सर्वात जास्त उत्पादन, जगाच्या बाजारात भारताचा शिक्का; शरद पवारांचा दावा

मुंबई : (Sharad Pawar On Farmers) मागील 15 वर्षांपूर्वी फळबाग लागवडीच्या संबंधित प्रचार राष्ट्रीय पातळीवर न्यावा अशी योजना मी आखली होती. आज भारत जगात सर्वात जास्त फळांचे उत्पादन (Fruit production) करणारा देश असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वासर्वे शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केलं. मी बाहेरील देशात गेलो की, तेथील बाजरात जातो. तेव्हा मला त्या बाजारात भारताचा शिक्का बघायला मिळतो असेही पवार म्हणाले.

दरम्यान रविवार दि. 1 रोजी त्यानी इंदापूर (Indapur) तालुक्यातील बोरी गावात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पवार म्हणाले, आज देशात मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन होते. परदेशातही द्राक्षाची निर्यात (Grapes export) होत असल्याचे त्यांनी सांगितले. एकेकाळी 86 टक्के लोक शेती करायचे तो आकडा 60 टक्क्यांवर आला असल्याचे शरद पवार म्हणाले.

इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातील काही गाव अशी आहेत की त्याबद्दल जास्त आत्मयिता आहे. प्रतिकूल परिस्थितीवर तेथील शेतकरी मात करुन चांगली शेती करत असल्याचे शरद पवार म्हणाले. 15 वर्षांपूर्वी फळबाग लागवड संबंधित प्रचार हा राष्ट्रीय पातळीवर न्यावा अशी योजना मी आखली आज जगात सर्वात जास्त फळ उत्पादन करणारा देश भारत असल्याचे पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये