ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

पवारांनी मोदी सरकारवर ‘अच्छे दिन’ ते लाल किल्ल्यावरील भाषणाची आठवणी करुन देत चढवला हल्लाबोल!

मुंबई : (Sharad Pawar On Narendra Modi) केंद्रातील मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून जनतेला अनेक आश्वासने दिले. मात्र, ते पुर्ण न केल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम असल्याच्या आकडेवारीसहीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांसमोर कुंडलीच मांडली. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत देशातील विरोधी पक्षाचे सरकार पडण्याचे कामे भाजपने केली आहेत. सात वर्षात 7-8 राज्यातील सरकार पडले आहेत, तर सध्या दिल्ली आणि झारखंड राज्यातील अनेक नेत्यांमागे ईडी, सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणांचा केंद्राकडून वापर केला जात असल्याचे पवारांनी सांगितले.

“केंद्राच्या सत्ताधारी पक्षाने २०१४ मध्ये निवडणुकीला सामोरं जाताना जनतेला अनेक आश्वासनं देण्यात आली. आश्वासनांच्या पुरततेचा आढावा घेतला तर त्यात समाधानकारक दिसत नाही. सत्ताधाऱ्यांनी अच्छे दिनची घोषणा केलेली. किंमती कमी होतील बोलेले होते. त्यानंतर अच्छे दिन नागरिकांना जावणले नाहीत,” असा टोला पवारांनी लगावला.

पवार यांनी बिल्कीस बानो प्रकरणावरुन म्हणाले, गुजरातमध्ये पंतप्रधान यांच्याच विचाराच्या सरकाने न्यायालयीन शिक्षा सुनावलेली असतानाही आरोपींना मुक्त केलं. त्यांनी लाल किल्ल्याच्या भाषणात महिलांना सन्मान देण्याची भूमिका मांडली गुजरातमधील निर्णयाने त्याची प्रचिती समोर आली,” असा टोला लगावला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये