ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

पवारांसमोरचा पेच सुटला? मोदींचा कार्यक्रम की संसदेतील ‘ते’ विधेयक ठरलं!

मुंबई : (Sharad Pawar On Narendra Modi) शरद पवार यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. एका बाजूला राज्यसभेत सेवा विधायक मांडण्यात येणार आहे तर, दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार असल्यामुळे ते पुणे दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक रोहित टिळक यांनी शरद पवार यांना प्रमुख पाहूणे म्हणून आमंत्रित केलं आहे. त्यामुळे पवार यांच्यापुढे राज्यसभेतील मतदानाला उपस्थित राहावे का? का पुण्यातील पीएम मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असा दुहेरी प्रश्ना उपस्थित झाला आहे. मात्र, आता हा सर्व प्रश्न काहीसा मार्गी लागला आहे.

दरम्यान, देशाचे पंतप्रधान हे मंगळवार दि. १ ऑगस्ट पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार यांना देखील आमंत्रन करण्यात आलं आहे. त्यामुळे पुण्यातील पंतप्रधानांचा कार्यक्रम की, संसदेतील मतदान हे प्रश्न अनेक दिवसांपासून उपस्थित केला जात होता.

अध्यादेशाचे गांभीर्य लक्षात घेऊन शरद पवार यांनी मंगळवार दि. १ ऑगस्ट रोजी पुण्यात न थांबता दिल्लीत हजर राहावे, अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पवारांना केली. त्यामुळे शरद पवार मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित हाणार की, मोदी सरकारच्या विरोधात मतदानसाठी राज्यसभेत हजेरी लावणार, हे पाहाणं महत्त्वाचे ठरणार आहे.

मात्र, लोकसभेच्या कामकाज यादीत त्या विधेयकाचा समावेश नसल्याने हा पेच आता टळण्याची शक्यता आहे. दरम्यान सप्लिमेंटरी बिझनेस लीस्टमध्ये हे विधेयक नसल्यास तर मात्र हे विधेयक उद्या राज्यसभेत येण्याची कुठलीही शक्यता उरणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये