ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

माहित नव्हतं एवढं महागात पडेल; मोदींच्या ‘त्या’ विधानावर पवारांची मिश्कील टिप्पणी!

ठाणे : (Sharad Pawar On PM Narendra Modi) राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या अनेक धोरणांवर आणि निवडणुक काळात जनतेला दिलेल्या आश्वासनावर बोलताना दिसून येत आहेत. त्यात आज पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वर्षापुर्वी केलेल्या विधानावरुन माध्यमांनी प्रश्न केला होता. यावेळी शरद पवारांनी आपल्या वेगळ्या आंदाजामध्ये मिश्कील टिप्पणी करत उत्तर दिलं आहे.

काही वर्षापुर्वी बारामती येथिल आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचे कौतुक करताना आपण त्यांचे बोट धरून राजकारणात आलो असल्याचं जाहिर सांगितलं होतं. या संदर्भात पवारांना मोदी तुमचं बोट धरून राजकारणात आले आहेत असं विचारण्यात आलं, यावर ते म्हणाले “मला माहित नव्हतं की हे इतकं महागात पडेलं” अशा प्रकारचे उत्तर देत त्यांनी फिरकी घेतली.

दरम्यान यावेळी शरद पवार म्हणाले की, मोदी सरकारने 2014 पासून ‘अच्छे दिन’ आणण्याचे वचन दिले होते. इंटरनेटद्वारे गावे जोडणी केली जाईल, प्रत्येक घरात शौचालय, पाणी आणि वीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते अद्याप पूर्ण केले नाही. केवळ छोट्या पक्षांना सत्तेतून बेदखल करणे हेच भाजपचे उद्दिष्ट असल्याचे सांगत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये