सुप्रिया सुळे राजकारणात येण्याचं; शरद पवारांनी उकललं गुपित!

पुणे : (Sharad Pawar On Supriya Sule) राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा देशाच्या राजकारणात मोठं प्रभाव आहे. सध्या त्यांच्या पाठोपाठ कन्या खासदार सुप्रिया सुळे या देखील राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी आपल्या कार्याने वेगळं स्थान निर्माण केलं आहे, त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेकदा संसदरत्न पुरस्कारनं सन्मानिक करण्यात आलं आहे.
पुण्यात सकाळ समूहाला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात शरद पवार आणि सुप्रिया सुळे या पिता-पुत्रींची मुलाखत घेण्यात आली. दरम्यान यावेळी त्यांना एका जुन्या मुलाखतीची आठवण करुन दिली. ज्यामध्ये पवारांनी म्हटलं होतं की, माझी मुलगी लगेच राजकारणात पडेल असं मला वाटत नाही. तिला तशी इच्छा पण नाही, अशी आठवण त्यांना करून देण्यात आली. याला उत्तर देताना त्यांनी सुप्रिया यांच्या राजकारणात येण्याविषयी एक मोठं गुपित उकललं आहे. शरद पवार म्हणाले, एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात.
पवार पुढं म्हणाले की, माझ्यावर झालेल्या संस्कारांचे श्रेय माझ्या आईचे आहे. आमच्या घरात कोणी शिक्षित नव्हते. पण आईनी आम्हाला शिकवलं. त्यामुळे माझा स्त्रियांविषयी विचार करण्याची मानसिकता तेव्हा पासूनच बदलली. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी आयुष्याला संघर्ष म्हणून बघत नाही. आपण अपेक्षा मापात ठेवल्या तर आयुष्य समाधानात जातं.