राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर शरद पवारांनी दिले उत्तर; म्हणाले…
![राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर शरद पवारांनी दिले उत्तर; म्हणाले... sharad pawar 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/sharad-pawar-1-780x470.jpg)
मुंबई : (Sharad Pawar Specks On President of India) देशात सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीच्या राजकिय चर्चेला उधान आलं आहे. त्यात संयुक्त पुरोगामी आघाडीतील उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव बऱ्याच पक्षांनी पुढं केलं आहे. महाराष्ट्रातील काही घटक पक्षांनी देखील हा राज्याचा सन्मान आहे म्हणत, पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. मात्र, यावर उत्तर देताना ‘मी राष्ट्रपती पदाच्या स्पर्धेत नाही’ असं खुद्द शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असल्यास आमचा त्याला पाठिंबा असलं, असं काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं. तर पवार साहेब राष्ट्रपती झाल्यास हा महाराष्ट्रासाठी सन्मानच आहे, असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले. मात्र, आता शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देत सर्व गोष्टींना पुर्णविराम दिला आहे.
तर राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांनी राष्ट्रपती होऊ नये, असं सांगत त्यांनी त्यामागचं कारण सांगितलं आहे. पवार साहेबांसारखं व्यक्तिमत्व स्वतःला राष्ट्रपती पदाच्या कोंडवाड्यात कोंडून घेऊ शकत नाही. सध्या ज्या पद्धतीनं पवार साहेब काम करतात, ग्रामीन भागात फिरतात, लोकांशी संवाद साधत लोकांची कामं करतात हे न थांबता अविरहीत चालू राहिलं पाहिजे. हा खरा त्यांचा सन्मान आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.