“महाराष्ट्रामागे उभी राहणारी केंद्रातील व्यक्ती म्हणजे…”; शरद पवारांनी सांगितलं नाव!

पुणे – Sharad Pawar on Nitin Gadkari | केंद्र सरकारमधील महाराष्ट्राच्या मागे भक्कमपणे उभी राहणारी व्यक्ती म्हणजे नितीन गडकरी (Nitin Gadkari), असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे. पुण्यातील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasant Dada Sugar Institute, Pune) वतीने राज्यस्तरीय साखर परिषदेचं उद्घाटनावेळी ते बोलत होते.
साखर कारखानदारीसाठी राज्य सरकारची मदत हवीच असते. सुदैवाने आताच्या सरकारमधील काही सहकारी उसाबाबत आणि साखरकारखानदारीबद्दल जाण असणारे आहेत. त्यामुळे त्यांचीही मदत होईल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उसाचा, साखरेचा आणि इथेनॉलचा किंवा कोणताही प्रश्न आला तरी नितीन गडकरी हे महाराष्ट्राच्या पाठिशी असतात. ते आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत याचा मनापासून आनंद असल्याचं पवार म्हणाले.