ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“शपथविधीला शरद पवारांची मूकसंमती….”, राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा खुलासा

मुंबई | Sharad Pawar – सध्या राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर त्यांच्यासोबत आलेल्या इतर 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे अनेक नेते, आमदार, खासदार उपस्थित होते. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे अकोले विधासभेचे आमदार किरण लहामटे (Kiran Lahamate) यांनी मोठा खुलासा केला आहे.

किरण लहामटे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं की, आम्हाला अजित पवार यांनी भेटायलं बोलावलं होतं, त्यामुळे मी तिथं गेलो होते. त्यावेळी आम्हाला वाटलं की कदाचित पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नेत्याची निवड होणार आहे त्यामुळे आम्ही तिकडे गेलो होतो. पण त्याआधी अजित दादांनी दुपारी 1.15 च्या दरम्यान आम्हाला शपथविधी सोहळ्याची कल्पना दिली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आपण भाजपबरोबर जाण्याची भूमिका घेत आहोत.

सत्तेत सहभागी होण्यापूर्वी अजित पवार यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली होती. त्या बैठकीवेळी पक्षातील ज्येष्ठ-श्रेष्ठ नेते उपस्थित होते. त्यामध्ये नरहरी झिरवाळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल असे नेते उपस्थित होते. त्यामुळे या सगळ्यांकडे बघून आम्हाला वाटलं की हा निर्णय कदाचित पवार साहेबांचाच असेल. तसंच मी सुरज कडलग यांना विचारलं तर समजलं की या सगळ्याला पवार साहेबांची मूकसंमती आहे. त्यामुळे मी शपथविधी सोहळ्यामध्ये गेलो होतो. पण नंतर आम्हाला समजलं की या सगळ्याला शरद पवारांची संमती नाही. मग त्यांनी संध्याकाळी सहा वाजता फोन करून आम्हाला परत फिरायला सांगितलं, असंही लहामटे यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये