Top 5ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

संजय पवारांच्या पराभवावर शरद पवारांची प्रतिक्रिया; “मान्य केले पाहिजे की, देवेंद्र फडणवीसांना…”

मुंबई – Sharad Pawar on Sanjay Pawar | राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला असून यामध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. हा निकाल माझ्यासाठी धक्का नसल्याचं प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी संजय पवारांच्या पराभवावरही भाष्य केलं आहे.

शिवसेनेने लढवलेल्या सहाव्या जागेसाठी मतांची संख्या कमी होती. तिथे आमचा फरत वाढत होता. पण धाडस करत प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्यात यश आलं असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रत्येक उमेदवाराच्या मतांची संख्या बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या कोट्यामध्ये काही फरक पडलेला नाही. पण एक मत प्रफुल्ल पटेल यांना जादा पडलं असल्याचं पवारांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये