ताज्या बातम्यारणधुमाळी

“संजय राऊतांना भिती वाटायला लागलीय की अंधारेताई…”, शिंदे गटाचा खोचक टोला

मुंबई | Shinde Group On Sanjay Raut And Sushma Andhare – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत चांगलीच फुट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. तसंच शिंदे गटानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरही दावा केला. मात्र, निवडणूक आयोगानं या दोन्ही गोष्टी गोठवल्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं आहे. अशातच उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या त्यांनी केलेल्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. तसंच आत्तापर्यंत सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणातून शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटानं अंधारेंची खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना भीती वाटू लागली असल्याचं विधान केलं आहे.

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची तुलना करत खोचक टोला लगावला आहे. “संजय राऊत यांना भिती वाटायला लागलीय की अंधारेताई आपली जागा तर घेत नाहीत ना? म्हणून आता अंधार कोठडीतूनसुद्धा ते प्रसारमाध्यमांशी बोलत आहेत”, असा टोला म्हात्रे यांनी लगावला आहे.

“संजय राऊत हे कसं बोलत आहेत, काय बोलत आहेत याची कल्पना नाही. पण हे सारं हस्यास्पद नक्कीच वाटत आहे”, असंही शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे समर्थक खासदार संजय राऊत हे मागील महिन्याभराहून अधिक काळापासून पत्राचाळ प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे ईडीच्या कोठडीत आहेत. सध्या संजय राऊत हे आर्थर रोड तुरुंगामध्ये कैद असून त्यांचा कोठडीतील मुक्काम 29 ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये