ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शिवसेना ठाकरेंचा साताऱ्याचा सेनापती कोण? शिवसैनिकातून शेखर गोरे नाव आघाडीवर!

सातारा : (Shekhar Gore Satara news shivsena) राज्यात शिवसेना फुटलेली असताना उद्धव ठाकरेंचा साताऱ्याचा सेनापती कोण अशी चर्चा आहे. त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेची सूत्रे शेखर गोरे यांच्याकडे देण्याची मागणी शिवसैनिकातून होत आहे. साताऱ्यात शिवसेनेला आक्रमक नेतृत्वाची गरज आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे बहुतांश वरिष्ठ पदाधिकारी शिंदे गटात गेले मात्र शिवसैनिक उद्धव ठाकरेंबरोबर कायम राहिले आहेत.

शिवसेनेला जिल्ह्यात उभारी देण्यासाठी व शिवसैनिकांना ताकद देण्यासाठी शेखर गोरे जिल्हाप्रमुख म्हणून नेमणूक करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. सातारा जिल्ह्यातील प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांसह गायब झाल्यामुळे साताऱ्यातील शिवसेना कार्यालयाला कुलूप लागले. परंतु शिवसेनेचे शेखर गोरे स्थानिक शिवसैनिकांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले.

शेखर गोरेंबरोबर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मोठी फौज असताना त्यांना डावलले जात असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. सातारा जिल्हा बँकेत शेखर गोरे आपल्या आक्रमक कार्यशैलींने बँकेच्या निवडणुकीत यशस्वी झाले. माण तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही शेखर गोरे यांनी आपला करिष्मा दाखवून दिला आहे.

पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी शेखर गोरे यांच्यासारख्या आक्रमक शिवसैनिकाकडे सूत्रे असावीत अशी अपेक्षा शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे. काही तालुक्यात कट्टर शिवसैनिक असून त्यांना अपेक्षित ताकद मिळत नाही साताऱ्याला कट्टर शिवसैनिकांची परंपरा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील असले तरी शिवसेना ठाकरे गटाचा जनाधार मोठा आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये