ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

मोठी बातमी! शिंदे-फडणवीसांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला!

मुंबई : राज्यात मागील पंधरा दिवस झाले राजकारणाला वेगळेच वळण आले आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजप सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे. राज्यपालांच्या निर्देशानुसार दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यावेळी शिंदे गट आणि भाजपाने १६४ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला. महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली, तर तीन आमदार तटस्थ राहिले.

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि त्याला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. सुरुवातीला आवाजी मतदान झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी करण्यात आली. यावेळी भाजप-शिंदे सरकारने १६४ मतांसहित बहुमताचा आकडा पार केला आणि विश्वासदर्शक ठराव जिंकला. महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली.

राज्यात १० दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडलं आणि शिंदे-भाजप सरकार आलं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानुसार आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला आणि शिक्कामोर्तब झालं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये