शिंदे गटाकडून आसाममधील पूरग्रस्तांना ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर!

मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीला आठ दिवस पूर्ण झाले आहेत. तेव्हापासून महाराष्ट्रातील राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहे. गेल्या आठ दिवसांपासून आसाममधल्या गुवाहाटीमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे राहत आहेत. सध्या आसाममध्ये प्रचंड पाऊस सुरु असून त्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परीस्थितीमध्ये महाराष्ट्रातील बंडखोर आमदार गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये मज्जा करत आहेत अश्या चर्चाना उधाण आलं होत. तर आज एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत आसाममधील पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे आमदार आणि सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी ट्वीटर द्वारे म्हटलं आहे. त्यांच्या या ट्वीटनंतर चर्चेला उधान आलं आहे. तर गेल्या चार ते पाच दिवसापूर्वी आसामच्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षनी देखील या बंडखोर आमदारांना आसाममधून लवकरात लवकर माघारी जावा आराम हे नैतिकता जपणार राज्य आहे असं म्हटलं होत.
दरम्यान, हे बंडखोर आमदार उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. तर आज सर्व आमदार आसाममधून गोव्याला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर उद्या सर्व आमदार बहुमत सिद्ध करण्यासाठी मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.