शिंदे बंडाळी प्रकरण अखेर न्यायालयात; अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात
नवी दिल्ली – Maharashtra Political Crisis : मागील सहा दिवसांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील गोंधळ आता कोर्टापर्यंत पोहोचला आहे. बंडखोर गटाचे एकनाथ शिंदे यांनी अपात्रतेच्या नोटीसाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शिंदे गटातील १६ आमदार अपात्र असल्याच्या याचिकेवर महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींनी त्यांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे त्या १६ आमदारांना २७ जूनच्या सायंकाळपर्यंत उत्तर द्यायची आहेत. (Maharashtra political crisis went in supreme court)
विधानसभेच्या उपसभापतींनी पाठवलेल्या याच नोतीसांच्या वैधतेवर शिंदे यानी सुप्रीम कोर्टात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह आणखी १५ जणांना या नोटीसा पाठवण्यात आलेल्या आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत न्यायालयाकडून कोणतेही निर्देश किंवा स्थगिती या नोटीस संदर्भात न आल्यास शिंदे सहित आणखी १५ आमदारांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.
यापूर्वी उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या विरुध्द देखील अविश्वासाची याचिका निनावी मेलवरून पाठवण्यात आली होती. मात्र त्यासाठी सर्व आमदारांना समोर हजार राहावे लागेल असे सांगत ती याचिका फेटाळण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्रात मात्र घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे बंडाळी प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे. एकीकडे गुवाहाटीमध्ये बंडखोर आमदारांची संख्या वाढतच चाललेली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतील नेते सभा आणी पत्रकार परिषदा घेत आहेत. आणि राज्यभरातील शिवसैनिक बंडखोर आमदारांच्या विरोधात आंदोलने आणि घोषणाबाजी करत आहेत.