ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शैलीदार लेखक शिरीष कणेकर काळाच्या पडद्याआड, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई | Shirish Kanekar Passed Away – शैलीदार लेखक, पत्रकार शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांचं निधन झालं आहे. ते 80 वर्षांचे होते. शिरीष कणेकर यांची आज (25 जुलै) सकाळी प्रकृती खालावली होती, त्यामुळे त्यांना हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

शिरीष कणेकर यांचे ‘फिल्लमबाजी’, ‘कणेकरी’ हे त्यांचे विनोदी लेख चांगलेच प्रसिद्ध आहेत. तसंच राजकारण, चित्रपट आणि क्रिकेट या विषयांवरील त्यांचे वृत्तपत्रांमधील स्तंभ प्रसिद्ध आहेत. तसंच लेखक असण्यासोबत शिरीष कणेकर यांची फिल्मी गप्पांची मैफल रंगविणारे वक्ते म्हणून देखील ओळख आहे.

शिरीष कणेकर यांनी पत्रकार म्हणून फ्रि प्रेस जर्नल, इंडियन एक्सप्रेस यांसारख्या वृत्तपत्रांमध्ये काम केलं आहे. तसंच त्यांचे मराठी वृत्तपत्रांमधील स्तंभलेखन देखील प्रसिद्ध होते. लोकप्रभा, साप्ताहिक मनोहर हे त्यांचे लेखही प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे शिरीष कणेकर हे एखाद्या समस्येवर विनोदी शैलीतून बोट ठेवणारे लेखक म्हणूनही ओळखले जायचे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये