पुणेमुंबईसिटी अपडेट्स

शिवसेनेला आणखी खिंडार पडेल

भीतीमुळेच ठाकरे जोरदार भाषण करताहेत : बावनकुळेंची टीका

औरंगाबाद : शिवसेनेला आणखी खिंडार पडणार आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. आणखी काही जण सोडून जाण्याच्या भीतीमुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता जोरदार भाषणे करत आहे, अशी टीकाही बावनकुळेंनी केली आहे. बावनकुळे शुक्रवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते. या वेळी पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. त्या वेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की शिवसेनेला आणखी खिंडार पडणार आहे. त्यामुळेच शिंदे गटातील काही जण नाराज असल्याची अफवा पसरवली जात आहे. मात्र, असे काहीही नाही. जुन्या सरकारपेक्षा आताचे सरकार कधीही चांगले, अशीच आता जनतेची व आमदारांचीही भावना आहे.

विधानसभेत २००+ चे लक्ष्य
आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गट व भाजपचे २०० हून अधिक आमदार निवडून येतील. तसेच, लोकसभेत ४५ हून अधिक खासदार निवडून येतील. महाराष्ट्रात आता पुन्हा पूर्णवेळ काम करणारे सक्षम सरकार आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेने कितीही प्रयत्न केले, तरी भाजप व शिंदे गट लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ५१ टक्के जागा जिंकेल.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. याबद्दल बावनकुळे यांनी सांगितले की, केवळ बारामतीच नव्हे, तर राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांत भाजपला मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी केंद्रीय मंत्री या मतदारसंघात जाणार आहेत. केंद्राच्या योजना या मतदारसंघातील सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत. याशिवाय राज्यातील ९८ विधानसभा क्षेत्रांतही राज्यातील मंत्री जाणार असून, त्या जागा पूर्ण ताकतीने लढण्याचा भाजप प्रयत्न करणार आहे. पुढे बावनकुळे यांनी सांगितले, की राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वच निवडणूक भाजप शिंदे गटासोबतच लढणार आहे. याबद्दल कुणीही शंका घेण्याचे कारण नाही. मविआचे काय होईल, हे सांगता येत नाही.
राज्यातील एकूण ६०८ ग्रामपंचायतींमधून भाजप व शिंदे गटाचे जवळपास ३३५ सरपंच निवडून आले, बावनकुळेंनी केला म्हणाले, भाजपचे २९४ सरपंच निवडून आले आहेत.

हे सरपंच भाजपच्या कोणत्या पदावर होते, याची माहिती माझ्याकडे आहे. तसेच, शिंदे गटाचे ४१ सरपंच निवडून आले आहेत. यातून जनता मागच्या सरकारच्या कंटाळली होती, हेच दिसून आले आहे. मविआने सत्तेत येताच मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, विदर्भ वैधानिक विकास मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत दुर्भाग्यपूर्ण होता. त्यामुळे बजेटमध्ये मराठवाडा, विदर्भासाठी किती कोटींची तरतूद करायची, हेच स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे या विभागांचा अनुशेष भरून काढण्यात अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत येताच पुन्हा वैधानिक विकास मंडळ सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे बावनकुळे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये