ताज्या बातम्यारणधुमाळी

‘…रथाच्या तोडफोडीमागे शिवसेनेचा हात’- प्रविण दरेकर

मुंबई : आज मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी भाजपच्या पोलखोल अभियानाची सुरुवात होणार होती. परंतु त्याआधी अज्ञातांनी रथाची तोडफोड करत नुकसान केलं आहे. मुंबईतील चेंबूर कॅम्प इथल्या भाजपा कार्यालयात विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत या रथयात्रेची सुरुवात होणार होती. परंतु रथयात्रेच्या आदल्या रात्री अज्ञाताने रथाची तोडफोड केली. यादरम्यान, संध्याकाळपर्यंत आरोपींना अटक केली नाही तर पोलिसांना घेराव घालू असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला आहे.

यावेळी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरुन भाजपची पोल खोल अभियान दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे. सोबतच रथाच्या तोडफोडीमागे शिवसेनेचा हात असल्याचा संशय दरेकरांनी व्यक्त केला आहे. तसंच या रथाच्या तोडफोड प्रकरणी तक्रार करण्यासाठी प्रविण दरेकर हे चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गेले. आरोपीला पकडलं नाही तर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडू. यावेळी कायदा सुव्यवस्था बिघडली तर यासाठी सरकार पूर्णपणे जबाबदार असेल, असा इशारा देखाल त्यांनी दिला आहे.

पुढे दरेकर म्हणाले, मुंबई पोलीस आयुक्त हे सरकारचे राजकीय कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. आम्ही लोकांसाठी पोल खोल करत आहोत तर मुंबई पोलीस हे सरकारचे गुलाम असल्यासारखे वागत आहेत. इफ्तार पार्टी तसेच राजकीय कार्यक्रमात मुंबई पोलीस व्यस्त आहेत. पण पोल खोल यात्रेला अडथळा येणार नाही याबाबतची काळजी मुंबई पोलीस आयुक्तांनी घ्यावी,

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये