‘बिग बाॅस’च्या घरात शिव ठाकरे पडला ‘या’ स्पर्धकाच्या प्रेमात, पाहा व्हिडीओ

मुंबई | Bigg Boss 16 – सध्या ‘बिग बाॅस 16’ (Bigg Boss 16) हे पर्व चांगलंच गाजतंय. या पर्वातील प्रत्येक स्पर्धकांनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. यापैकी एक म्हणजे बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व जिंकलेला स्पर्धक शिव ठाकरे (Shiv Thakare). शिव ठाकरे हा बिग बॉस 16 मध्ये सहभागी झाला आहे. शिवनं या पर्वात पहिल्या दिवसांपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तसंच बिग बाॅसमध्ये काही दिवसांपासून शिव ठाकरेच्या लव्ह लाईफबद्दल जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. त्यातच आता शिव ठाकरे घरातील एका स्पर्धकाच्या प्रेमात पडला आहे.
नुकताच ‘बिग बॉस 16’च्या आगामी भागाचा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक (Abdu Rozik) रोमॅंटिक अंदाजात पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये शिव अब्दुला छेडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर अब्दू देखील लाजतो आणि शिवला थप्पड मारतो. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
शिव आणि अब्दुचा हा रोमँटिक व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. शिव आणि अब्दू त्यांच्या रोमॅंटिक अंदाजात चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.