ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

दसरा मेळाव्याआधी शिवसेनेचा धमाका? शिंदे गटाला शह देण्यासाठी ठाकरेंनी केला ‘हा’ मास्टर प्लान!

मुंबई : (Shivsena mumbai melava) आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यामुळे  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ पुन्हा एकदा मुंबईत धडाडणार आहे. ठाकरेंचा आवाज संपूर्ण देशभर घुमणार असा हा मेळावा असणार आहे. कारण शिंदे गटाच्या बंडानंतरचा हा पहिलाच जाहीर मेळावा होत आहे.  तेव्हा उद्धव ठाकरे आपल्या भात्यातल्या शस्त्रांसह  रणांगणांत उतरतील.

गेली अनेक वर्ष सत्ता असलेली मुंबई महानगरपालिका आपल्याच ताब्यात ठेवण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे. कारण शिवसेनेतला शिंदे गट आता वेगळा होऊन तो भाजपसोबत सध्या सत्तेत आहे. उद्धव ठाकरेंविरुद्ध भाजप, मनसेसह शिंदेगटाचं आव्हान असणार आहे. तेव्हा आपला गड मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे नेस्कोच्या मैदानात उतरणार आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर मंचावर कुठेच भाषण केलं नव्हतं. त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसैनिकांमघ्ये बळ निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरतील आहेत.

एकेकाळी खांद्याला खांदा लावून ठाकरे, शिंदे आणि फडणवीस कामं करायचे, पण आता ठाकरे विरुद्ध सारे असं चित्र तयार झालं आहे. शिवसेनेचे निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या अनेकांनी पक्षाची साथ सोडत शिंदे गटात सामील झाले आहेत. हे मंडळी आत्तापर्यंत ज्या मातोश्रीला देवाचा गाभारा मानायचे तेच लोक आता खालच्या पातळीवर टिका करताना दिसत आहेत. त्यामुळे गटप्रमुखांचा मेळावा म्हणजे पक्षाला नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्न म्हणावा लागेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये