ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

महाराष्ट्रातील शिवसेना-शिंदे सत्तासंघर्षावरील सुनावणी होणार ‘या’ तारेखेला!

नवी दिल्ली : (Shivsena-Shinde Group Case new date Court) शिवसेना-शिंदे गटातील वादाच्या सुनावणीला न्यायालयाकडून सध्या ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे. शिवसेनेच्या वादावरील सुप्रीम कोर्टात आज होणारी सुनावणी आता पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. मागील सुनावणी दरम्यान हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवलं होतं.

त्यावेळी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाकडून गुरुवारची तारीख देण्यात आली होती. मात्र, आत्तापर्यंतच्या आलेल्या माहितीनुसार आज ही सुनावणी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेना-शिंदे वादाची सुनावणी आता लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही सुनावणी सोमवार दि. 29 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षा बाबतची सुनावणी सातत्यानं पुढं ढकलली जात होती. न्यायालयाकडून फक्त तारीख पे तारीख दिली जात आहे. आजपर्यंत अनेक सुनावण्या झाल्या मात्र, यातून कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे सामान्य जनतेच्या मनात शंकेच्या पाली चुकचुकल्या तर नवल वाटायला नको.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये