देश - विदेश

आमदारांच्या अपात्रतेबाबत उद्या फैसला? शिंदे-फडणवीस सरकार राहणार की जाणार?

नवी दिल्ली : (Shivsena-Shinde Group Supreme Court tomorrow Hearing) चार महिन्यापूर्वी एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यांनंतर शिंदेंनी थेट सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेवरच दावा केल्याने खरी शिवसेना कुणाची? या प्रश्नाने सध्या ठाकरे-शिंदे गटाला ग्रासून टाकलं आहे. यावर निर्णय देण्यासाठी न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमुर्तींचे घटनापीठ स्थापन करण्यात आलं. मात्र, तरीही ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे. जवळपास पाच आठवड्यानंतर मंगळवार दि. 1 नोव्हेंबर रोजी राज्याच्या सत्तासंषर्घाची सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. कमीत कमी उद्या तरी काही निर्णय हाती येतो का? नवी तारीख दिली जातीय याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

१६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेण्यापासून आयोगाला रोखावे, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. कोर्टाने निवडणूक आयोगाला यासंबंधी कोणतीही कार्यवाही न करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयावर स्थापन केलेल्या घटनापीठाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर घातलेली बंदी उठवली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता उद्या सुप्रीम कोर्टात काय निर्णय होतो, हे पाहावे लागेल.

ठाकरे गटाकडून ‘खरी शिवसेना आमचीच’ असं म्हणत कागदांची लढाई लढली जात आहे. ट्रकचे ट्रक भरुन पुरावे निवडणूक आयोगाकडे पाठवले जात आहेत. परंतु त्यापूर्वी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये