ताज्या बातम्यापुणेशिक्षण

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार डॉ. देगलूरकर यांना प्रदान

पुणे : ‘महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठान’, पुणे यांचा पहिला “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार” मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.
हा कार्यक्राम बालगंधर्व नाट्यमंदिर येथे झाला. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोप सोहळ्याचे औचित्य साधून हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी गायीका उषा मंगेशकर, पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, माजी खा. प्रदीप रावत, माजी महापौर मुरलीधर मोहोळ प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन, अमृत पुरंदरे, राधा पुरंदरे आगाशे, प्रतिष्ठानचे पदाधिकारी अभिषेक जाधव, ॲड. विशाल सातव आदी उपस्थित होते.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या वडिलांच्या नावे ‘श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती पुरस्कार-२०२२’ इतिहासाचे अभ्यासक संदीप तिखे यांना जेष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि अमृत पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुढील वर्षीपासून संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्तीसाठी इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतीने ११ लाख रुपयांची मदत करण्यात येईल, अशी घोषणा पुनीत बालन यांच्यावतीने करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये