ठाकरे सरकार बरखास्त?; संजय राऊत यांचं धक्कादायक ट्विट!
![ठाकरे सरकार बरखास्त?; संजय राऊत यांचं धक्कादायक ट्विट! Sanjay Raut 3](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/Sanjay-Raut-3-780x470.jpg)
मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड ठाकरे सरकारला बरखास्त करणार असल्याचं दिसत आहे. मंगळवारपासून नॉट रिचेबल असलेल्या एकनाथ शिंदे यांनी बुधवारी माध्यमांसमोर येत त्यांच्या गटात असलेल्या आमदारांची संख्या सांगितली. त्यानंतर आता राज्यात आता सत्तांतर होण्याची चिन्हे दिसत आहेत. अशातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, एकनाथ शिंदेंसोबत माझं बोलणं झालं आहे. त्यांच्याशी पक्षाचा संवाद सुरु असून त्यांनी बाळासाहेबांपासून शिवसेनेचं काम केलं आहे.
दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही आपल्या ट्विटर हँडलच्या बायोमधून त्यांच्याकडे असलेल्या पदभारांचा उल्लेख काढून टाकला आहे.