“तब्बल 8 वर्षांनी…”, श्रेया बुगडेची ‘चला हवा येऊ द्या’ साठी खास पोस्ट!
!["तब्बल 8 वर्षांनी...", श्रेया बुगडेची 'चला हवा येऊ द्या' साठी खास पोस्ट! shreya bugde](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/07/shreya-bugde.jpg)
मुंबई | Shreya Bugde’s Post Gone Viral – झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. या लोकप्रिय कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, मराठी चित्रपट, नाटक क्षेत्रासह राजकारणातील दिग्गज मंडळी येऊन गेली आहेत. झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाला तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या सर्वच कार्यक्रमातील प्रेक्षकांसाठी अभिनेत्री श्रेया बुगडेनं एक गुडन्यूज शेअर केली आहे.
श्रेया बुगडेनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची संपूर्ण टीम पाहायला मिळत आहे. त्यासोबत हे सर्वजण ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष करताना दिसत आहे. तसंच ‘चला चला चला…हवा येऊ द्या’ असंही ते यात बोलताना दिसत आहे. या व्हिडीओला श्रेयानं हटके कॅप्शन देखील दिलं आहे.
“तब्बल 8 वर्षांनी, नव्या वास्तूत आजपासून थुक्रटवाडी चा श्री गणेशा!!! तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या नेहेमीप्रमाणे”, असं श्रेयानं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तिची ही पोस्ट आणि व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्या या पोस्टवर अनेक चाहते लाईक्स आणि कमेंट करताना दिसत आहेत.