“मुख्यमंत्री 20 तास काम करतात हे विरोधकांच्या…”, खासदार श्रीकांत शिंदेंची टीका

मुंबई | Shrikant Shinde Criticizes Opponents – राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी घटनापीठासमोर सुरू असताना सरन्यायाधीशांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा शनिवारी, मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सरन्यायाधीशांवर कौतुकाचा वर्षाव केला होता. त्यावरुन विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यालाच आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सध्या राज्यात विरोधकांना कोणतंही काम नाही. विरोधकांना पूर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसतात. त्यांच्या स्वप्नातही एकनाथ शिंदे येतात. एक व्यक्ती 20 तास काम करत असल्यानं विरोधकांना डोळ्यात खुपायला लागलं आहे, अशी खोचक टीका श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.
यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त गणेशोत्सव नव्हे तर ज्या प्रकारे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतले त्यांची विरोधकांनी धास्ती घेतली आहे. हा माणूस दिवसातील 20 तास कसं काम करू शकतो, या गोष्टी आता विरोधकांच्या डोळ्यांमध्ये खुपत आहेत. ही तर फक्त सुरूवात असून ‘ये झाकी है पिक्चर अभी बाकी है'”, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
राज्यामध्ये असलेलं सरकार हे बहुमताचं सरकार आहे. विरोधकांना विरोधात बसून दुसऱ्या गोष्टी नाहीत. त्यांना पूर्णवेळ मुख्यमंत्री शिंदेच दिसतात. इतकंच नव्हे तर त्यांच्या स्वप्नातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत असल्याचं खासदार शिंदे यांनी म्हटलं आहे.