ताज्या बातम्यामनोरंजन

सारा आणि शुभमन दिसले पुन्हा एकत्र; नेटकरी म्हणाले नेमकी भानगड काय

मुंबई | क्रिकेटर शुभमन गिल (Shubman Gill) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्या अफेअरच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत असतात. अशातच सारा आणि शुभमनचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याआधीही सारा आणि शुभमनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

एका चाहत्याने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सारा आणि शुभमन बाजूबाजूला बसलेले असून ते एकमेकांशी गप्पा मारण्यात मग्न असल्याचं पहायला मिळत आहे. हा फोटो एअरपोर्टवरील असल्याचं दिसत आहे. मात्र सारासोबतचा शुभमनचा हा फोटो नवीन आहे की जुना हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी भानगड असल्याच नेटकरी म्हणत आहेत.

Shubman and Sara

त्यांच्या अफेअरच्या चर्चा का रंगल्या ?

सारा आणि शुभमनला अनेक वेळा तर एकत्र पाहिलं गेलच आहे परंतु, एका पंजाबी चॅट शोमध्ये शुभमनने डेटिंगच्या चर्चांवर मौन सोडलं होतं. तुझ्या मते बॉलिवूडमधील सर्वांत फिट अभिनेत्री कोणती, असा प्रश्न त्याला या शोमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना शुभमनने लगेच साराचं नाव घेतलं होतं.

याच कार्यक्रमात त्याला साराचं नाव घेतल्यानंतर त्याला डेटिंगविषयी पुढचा प्रश्न विचारण्यात आला. तू सारा अली खानला डेट करतोयस का, असं विचारण्यात आलं होतं. त्यावर तो म्हणाला, “कदाचित”. ‘सारा का सारा सच बोलो’, असं सूत्रसंचालकाने म्हटल्यावर शुभमनच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. “सारा दा सारा सच बोल दिया.. कदाचित हो, कदाचित नाही”, असं त्याने पुढे सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये