सिद्धू मुसेवाला यांचं ‘हे’ नवीन गाणं झालं प्रदर्शित, काही तासातच मिळाले 1 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज
![सिद्धू मुसेवाला यांचं 'हे' नवीन गाणं झालं प्रदर्शित, काही तासातच मिळाले 1 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज siddhu mosse wala](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/04/siddhu-mosse-wala-780x470.jpg)
मुंबई | Siddhu Mosse Wala New Song – नुकतंच दिवंगत गायक सिद्धू मुसेवाला (Siddhu Mosse Wala) यांचं एक नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘मेरा ना’ (Mera Na) असं या त्यांच्या या नवीन गाण्याचं नाव आहे. तसंच आता हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आसून प्रेक्षकांनी या गाण्याला चांगलीच पसंतीस दर्शवली आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या या नवीन गाण्याला आत्तापर्यंत 1 मिलियनहून अधिव व्ह्यूज मिळाले आहेत. (Siddhu Mosse Wala New Song)
सिद्धू मुसेवाला यांच्या निधनानंतर त्यांचं हे तिसरं गाणं रिलीज झालं आहे. याअगोदर त्यांची ‘SYL’ आणि ‘वाॅर’ ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या दोन्ही गाण्यांनाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. तसंच आता त्यांचं तिसरं नवीन गाणं ‘मेरा ना’ प्रदर्शित झालं आहे.
सध्या सिद्धू यांचं ‘मेरा ना’ हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्याला काही तासांतच मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर काही तासातच या गाण्याला 1 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
दरम्यान, ग्रॅमी पुरस्कार विजेते नाइजीरियन रॅपरनं सिद्धू मूसेवाला यांचं ‘मेरा ना’ हे नवीन गायलं आहे. या गाण्याला सध्या मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच हे नवीन गाणं सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे.