ताज्या बातम्यामनोरंजन

सिद्धार्थ-कियाराच्या लग्न सोहळ्यात लावले गेलेत ‘हे’ निर्बंध

Sidharth-Kiara Wedding : गेल्या काही दिवसांपासून कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांच्या लग्नाची लगबग सुरु आहे. हे दोघेही सूर्यगड पॅलेस जैसलमेर येथे विवाहस्थळी रवाना झाले आहेत. कियारा ही डिझायनर मित्र मनीष मल्होत्रासोबत जैसलमेरला पोहोचली. तर, संध्याकाळी उशिरा सिद्धार्थ मल्होत्रा देखील जैसलमेरला पोहोचला आहे. आज या जोडप्याचा मेहंदी सोहळा होणार आहे. दरम्यान या दोघांनी देखील आपल्या लग्नात सामील होणाऱ्या पाहुण्यांवर काही निर्बंध लावण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इतर सेलिब्रिटींच्या लग्नाप्रमाणे यामध्येही नो-फोन पॉलिसी असणार आहे. पाहुण्यांप्रमाणे हॉटेल कर्मचाऱ्यांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. इतकेच नाही, तर वधू-वरांनी पाहुण्यांना त्यांचे कोणतेही फोटो सध्या सोशल मीडियावर पोस्ट न करण्याची विनंती केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नातील प्री-वेडिंग सोहळा 4 आणि 5 फेब्रुवारीला होणार आहेत. तर, 6 फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. मेहेंदी, हळद आणि संगीत या सगळ्या कार्यक्रमांसाठी दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये