ताज्या बातम्यारणधुमाळी

…म्हणून राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्विकारण्यास राजेंद्र पवारांनी दिला नकार

माळेगाव : आज नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, दिंडोरी रोज म्हसरुळ येथे राज्य सरकारचा कृषि पुरस्कार वितरण सभारंभ पार पडला. तसंच राज्यशासनाच्यावतीने दिला जाणार डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार हा राज्यपाल भगत सिंह कोशारी यांच्या हस्ते दिला जाणारा होता. हा पुरस्कार स्वीकारण्यास अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी नकार दिला. कारण गेल्या काही महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले या थोर नेत्यांविषयी राज्यपाल कोशारी यांनी अक्षेपार्य विधाने केल्यानं राजेंद्र पवार यांनी मी पुरस्कार स्वीकारण्यास गेलो नसल्याचं सांगितलं आहे.

तसंच त्यामध्ये डॉ. पंजाबराव देखमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषीभूषण , वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखेपाटील कृषी सेवारत्न पुरस्कार संबंधितांना प्रधान करण्यात आले. परंतु पवार यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार घेण्यास जाहिर नकार दिलाअसल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले की,मला शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहिर केला याचा आनंद आहे. मी शेती आणि शिक्षणाक्षेत्रात केलेल्या आजवरच्या कार्य़ाबद्दल शासनाकडून याची दखल घेतली गेली आहे. परंतु ज्या व्यक्तीच्या ह्स्ते हा पुरस्कार दिला जातोय ते राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले या थोर नेत्यांविषयी अक्षेपार्य विधाने केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मियतेला धक्का पोचला आहे. खरंतर महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकर आशा थोर नेत्यांना माननारा आहे. जर हाच पुरस्कार कृषी विभागाने दिला असता तरी मी तो पुरस्कार आनंदाने स्वीकारला असता असं असं स्पष्ट शब्दांत सांगून हा पुरस्कार स्वीकारत नसल्याच स्पष्ट केलं

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये