पोलिसांनी जोपासली सामाजिक बांधीलकी

घोडेगाव : पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सदरचा उपक्रम राबविला. यावेळी बहुसंख्येने हिंदु-मुस्लिमबांधव उपस्थित होते. घोडेगाव येथील सुन्नी मोमीन मस्जित येथे इफ्तार पार्टी संपन्न झाली.
यावेळी मुस्लिबांधवांनी खजूर, फळे व शीतपेयांचा आस्वाद घेतला. तसेच ही रमजान ईद सर्वांनी एकत्र येत आनंदात व शांततेत साजरी करावी, असे यावेळी घोडेगावचे पोलीस उपनिरीक्षक सतीष डौले तसेच अनेक मान्यवरांनी मुस्लिमबांधवांना मार्गदर्शन केले. मौलाना नदीम अजहरी यांच्या उपस्थितीत आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर लहान बालकांचा रोजा सोडण्यात आला.
या प्रसंगी घोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक सतीष डौले, घोडेगावचे सरपंच क्रांती गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, ग्रामपंचायत सदस्य मस्जीत मुजावर, अकबर पठाण युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष इम्रान पठाण, पोलीस नाईक अविनाश कालेकर, दत्तात्रय जढर, होमगार्ड स्वप्नील कानडे, आसीफ तांबोळी, आलीम शेख, नाजीम मुजावर, तत्वीर मुंढे, तसेच पोलीस कर्मचारी, अकबर पठाण युवा फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते, सुन्नी मुस्लीम जमात घोडेगाव व स्थानिक नागरिक हिंदु-मुस्लिमबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.