निरंतर नि:शुल्क ऊर्जा; सौर कृषी वाहिनी 2.0 चे उद्घाटन
मुंबई : महाराष्ट्र सरकारने नव्या वर्षात शेतकऱ्यांसाठी मोठी भेट दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.० ची घोषणा केली आहे. सौर उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती निर्माण करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतात, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करुन देणे हा आहे. मुख्यमंत्री सौर कृषी फीडर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी निरंतर सौर उर्जा मिळेल. राज्यात सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी १६,००० मेगावॅट वीज देण्यात येते. गेल्या दोन वर्षात सर्व फीडर सौर उर्जेत बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सौर कृषी प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले, ज्यात मुख्य सचिव सुजाता सौनिक, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर आणि इतर अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात उंब्रठा व नारंगवाडी गावातील शेतकरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी उंबरठा (जि. वाशिम) आणि नारंगवाडी (जि. धाराशिव) येथील सौर कृषी प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी उंब्रठा आणि नारंगवाडी गावातील शेतकऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सौर कृषी प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, सरकारच्या या उपक्रमाकडे गेम चेंजर म्हणून पाहिले जात आहे. तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरी हरित क्रांती
महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती निर्माण करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका देखील निभावू शकतात. तसेच या महत्वपूर्ण योजनेचा उद्देष राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करुन देण्याचा असणार आहे. याशिवाय या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी निरंतर सौर उर्जा देखील मिळणार आहे. तसेच राज्यात सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी तब्बल१६,००० मेगावॅट वीज देखील देण्यात येते. मात्र गेल्या दोन वर्षात सर्व फीडर सौर उर्जेत बदलण्याचा प्रयत्न केला जात