क्राईमताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

सोनिया गांधींच्या मागे ईडीची पिडा? चौकशीसाठी ईडीचा खास प्लान!

नवी दिल्ली : (Sonia Gandhi On ED Inquiry) काही दिवसांपुर्वी नॅशनल हेराल्ड प्रकरणी काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीमार्फत सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी कोरोनासंसर्गामुळे ईडी चौकशीला हजर राहू न शकलेल्या काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी  यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावले आहे. गुरुवार दि. 21 रोजी सकाळी 11ः00 वाजता सोनिया गांधींना चौकशीला हजर राहण्याचे समन्स आहे. प्रियंका गांधींना ईडी कार्यालयात हजर राहण्याची परवानगी द्या आणि हवेशीर आणि प्रशस्त रुममध्ये चौकशी करा, अशी विनंती सोनिया गांधींनी ईडी अधिकाऱ्यांकडे केली आहे. 

दरम्यान, ईडीनं सोनिया गांधींच्या चौकशीसाठी खास प्लान तयार केला आहे. त्यांची ईडीकडून तीन टप्प्यांमध्ये चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी ईडीच्या अतिरिक्त संचालक मोनिका शर्मा करणार आहेत. प्रश्नांच्या पहिल्या टप्प्यात, त्यांना वैयक्तिक प्रश्न विचारले जातील ज्यांची संख्या 10 पर्यंत असू शकते. या प्रश्नांमध्ये ती आयकर विभागात कर भरता का? त्यांचा पॅन क्रमांक काय आहे? देशात त्यांची कुठे-कुठे मालमत्ता आहे? परदेशात मालमत्ता कुठे आहे? त्यांची किती बँक खाती आहेत? कोणत्या बँकेत खाती आहात? अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार असण्याची शक्यता आहे.

चौकशीचा दुसरा टप्पा बराच वेळ लांबला जाण्याची शक्यता आहे. यानंतर तिसर्‍या टप्प्यात त्यांना काँग्रेसबाबत प्रश्न विचारले जातील. एजेएल असो की, यंग इंडियन असो किंवा मग काँग्रेस, सर्वांच्या सोनिया गांधी या प्रमुख व्यक्ती आहेत. तिसऱ्या टप्प्यात त्यांची सर्व पैलूंवर चौकशी केली जाईल. गांधी यांची तब्बल 8 ते 10 तासांपर्यंत चौकशी होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये