धक्कादायक! कास्टिंग काउचने ४८ वर्षाच्या अभिनेत्रीला ५० हजारांच्या बदल्यात केली शरीरसुखाची मागणी
चित्रपट सृष्टीत अनेक वाईट अनुभव अभिनेत्रींना येतात. अभिनेत्री आपली लोकप्रियता कमी होऊ नये किंवा आपल्याला चित्रपटात काम मिळणार नाही या भीतीने आपल्याला आलेले वाईट अनुभव शेअर देखील करत नाहीत. मात्र काही अभिनेत्री निर्भीडपणे या गोष्टी सामोर आणतात. असाच एक कास्टिंग काउचबद्दलच्या धक्कादायक अनुभवाचा खुलासा दाक्षिणात्य अभिनेत्री हिने उघड केला आहे.
अभिनेत्री चार्मिला ही ४८ वर्षाची आहे. तिने सांगितले की, ज्या चित्रपट निर्मात्याबरोबर ती काम करायची तो अगोदर तिला मोठी बहिण म्हणायचा मात्र नंतर तिच्याकडे त्याने ५० हजार रुपयांच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केली. Indiaglitz ला दिलेल्या मुलाखतीत तिने सविस्तर अनुभव शेअर केला. अलीकडेच ती कालिकत मध्ये एका चित्रपटाची शुटींग करत होती. त्या मल्याळम चित्रपटात ती आईची भूमिका सकारत होती. असं तिनं सांगितलं.
चित्रपट निर्माता २४ वर्षाचा तरुण होता. सुरुवातीला तो चार्मिलाला ताई म्हणायचा मात्र तीन दिवसानंतर त्याने तिच्या असिस्टंटकडे जाऊन ५० हजार रुपयाच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर चार्मिला त्या निर्मात्याला बोलली की, “तू माझ्या मुलापेक्षा थोडाच मोठा आहेस, त्यामुळं मी तुझ्या आईसारखी आहे.” मात्र त्याने चार्मिलाचं ऐकलं नाही. त्यानंतर चार्मिला संतापून चेन्नईला परत आली.