मनोरंजनमहाराष्ट्रशिक्षण

‘सरला एक कोटी’ चित्रपटाच्या टीमच्या हस्ते स्पार्कटेक २०२३ तांत्रिक महोत्स्वाच्या पोस्टरचे अनावरण

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती पुणे महाविद्यालयातील आयएसटीई विद्यार्थी विभागाच्या वतीने स्पार्कटेक २०२३ या तांत्रिक महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. या तांत्रिक मोहोत्सावाच्या पोस्टरचे अनावरण सरला एक कोटी या चित्रपटातील अभिनेते विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, रमेश परदेशी आणि यशपाल सारनाथ लेखक दिग्दर्शक नितीन सुपेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या महोत्सवामध्ये रोबोट स्पर्धा ट्रेझर अँड हंट, सर्किट डिझाईन,फॅशन शो, सिंगिंग, डान्स, स्ट्रीटप्ले यासारख्या विवध स्पर्धा होणार आहेत. या प्रसंगी अभिनेते विजय निकम यांनी स्पार्कटेक २०२३ सारखे तांत्रिक मोहोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठच आहे. या सारख्या स्पर्धांमुळे स्टेजडेअरिंग, संभाषण कौशल्य, संघभावना या सारख्या सुप्त गुणांना विकसित होण्यासाठी मोठा वाव मिळणार आहे.

या व्यासपीठाचा वापर विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण उन्नतीसाठी करावा असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुरेश विश्वकर्मा व रमेश परदेशी यांनी चित्रपटातील मायावी जग आणि वास्तव या विषयी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. कलाकारांना करावा लागणारा आर्थिक, सामाजिक संघर्ष, कौटुंबिक त्याग याचे उदाहरण देऊन स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमाचे नियोजन संगणक विभाग प्रमुख प्रा. रमा गायकवाड यांनी केले.

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे, कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. रमा गायकवाड, प्रा. प्रांजल मोरे, सर्व विभाग प्रमुख, आयएसटीई विद्यार्थी विभागाचे सर्व सदस्य, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाने अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस मा.सौ. प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये