नागरिकांच्या तीव्र निषेधानंतर श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा टोकाचा निर्णय

कोलंबो – Shrilanka PM ranil wickremesinghe : मागील काही दिवसांपासून श्रीलंकेत आर्थिक संकट आल्यानं राजकीय उलथापालथ जोरात सुरु आहे. शनिवारी हजारोंच्या संख्येनं संतप्त नागरिक सरकारचा निषेध करत रस्त्यावर उतरले होते. त्यांनी राजभवनाला देखील घेराव घातला होता. राजभवनात आंदोलकांन प्रवेश केल्यानंतर श्रीलंकेचे राष्ट्रपती गोतायाबा राजपक्षे यांना निवासस्थानावरून पळ काढावा लागला. नागरिकांच्या आंदोलनाने तीव्र रूप धारण केल्यानंतर श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी तातडीची कॅबिनेट बैठक बोलावली होती.
कॅबिनेट बैठकीत चर्चा झाल्यांतर अवघ्या काही मिनिटांतच पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (PM ranil wickremesinghe) यांनी आपला पंतप्रधान पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता श्रीलंकेतील आर्थिक आणि राजकीय संघर्षाला वेगळं वळण आल्याचं दिसंत आहे.
देशातील बिकट आर्थिक स्थितीने त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज (शनिवार) आंदोलन करत राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला होता. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी खासदार रजिता सेनारत्ने यांच्या घरावरही हल्ला चढवला. आंदोलनाने तीव्र रूप धारण केल्याने श्रीलंकेतील संसदेत पोदुजाना पेरामुना (SLPP) च्या सोळा सदस्यांनी केली होती. दबाव वाढल्याने त्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांनी कॅबिनेट बैठक बोलवून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.