इतरक्रीडाताज्या बातम्या

भारतीय संघाला मोठा धक्का; ‘हा’ स्टार खेळाडू जखमी, रोहित शर्मानं केला खुलासा

Asia Cup 2023 | आज (10 सप्टेंबर) भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) संघात आशिया कप 2023 (Asia Cup 2023) चा सुपर सामना खेळवला जात आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. तर या सामन्यामध्ये पाकिस्ताननं टॉस जिंकून आपलं खातं उघडलं आहे. अशातच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण भारतीय संघाचा स्टार खेळाडू संघातून बाहेर पडला आहे.

इशान किशन आणि केएल राहुल या दोघांची नावं टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये होती. पण त्यापैकी एक बाहेर पडणार हे निश्चित मानलं जात होतं. अशातच आता स्टार खेळाडू श्रेयस अय्यर संघातून बाहेर पडला आहे. श्रेयस अय्यर हा संघात खेळणार हे निश्चित होत पण अखेरच्या क्षणी तो संघातून अचानक बाहेर पडला.

याबाबत रोहित शर्मानं खुलासा केला, त्यानं नाणेफेकीच्या वेळी सांगितलं की, आम्ही टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणार होतो. कारण आम्ही आव्हानासाठी पूर्णपणे तयार आहोत. तसंच सध्या संघात दोन बदल झाले आहेत. एक म्हणजे जसप्रीत बुमराहनं पुनरागमन केलं आहे तर दुसरं म्हणजे श्रेयस अय्यरला पाठीचा त्रास होत असल्यानं त्याच्या जागी आता केएल राहुल खेळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये