ताज्या बातम्यादेश - विदेश

ईदच्या पूर्वसंध्येला राजस्थानात तुफान दगडफेक

जयपुर : राजस्थान मधील जोधपूर इथं काल ईदच्या पुर्वसंध्येला काल रात्री दोन समुदायांमध्ये वाद उफाळून आल्याने तुफान दगडफेक झाली. यामध्ये नागरीकांसह काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. या प्रकरणामुळं जिल्ह्यातली चोख बंदोबस्तासह इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. परशुराम जयंती आणि ईद दोन्ही एकाच दिवशी आहेत. स्वातंत्र्य सैनिकाच्या पुतळ्यावर झेंडा फडकवण्यावरून दोन गटांमध्ये हा वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, जिथे नमाझ पठण केलं जातं, त्या परिसरात परशुराम जयंतीनिमित्त झेंडे लावण्यात आले होते. त्यानंतर ईदनिमित्ताने मुस्लीम समाजााला झेंडे लावायचे होते. त्यामुळे दोन्ही गट आमने-सामने आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ईदगाहच्या जवळील परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी हस्तक्षेप करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन्ही गटांतला तणाव वाढला आणि दगडफेक सुरू झाली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून जोधपूरमधली इंटरनेट सेवा पोलिसांनी बंद केली आहे. अशी माहिती एका पोलिस आधिकाऱ्याने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये