ताज्या बातम्यामनोरंजन

दिग्पाल लांजेकरांच्या शिवराज अष्टकमधील पाचवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांच्या पराक्रमावर आधारलेले अनेक चित्रपट यापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. लोकप्रिय लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकमधील पहिल्या चार चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ‘शेर शिवराज’ नंतर दिग्पालचा शिवराज अष्टक मधील पाचवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा म्हणजे सुभेदार. शिवरायांचे शूरवीर मावळे तान्हाजी मालुसरेच्या पराक्रमावर आधारित हा सिनेमा असणार आहे.

या सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. रक्तामंदी उसळं तापता लाव्हा, शिवराय शब्दाची आन आम्हाला, वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू, जिंकून नाचवू ध्वज भगवा, आले मराठे आले मराठे, आदी न अंत अश्या शिवाचे (महादेवाचे), मोडीतो वैऱ्याची मुंडकी मोजून, पाच्छाई झोडती असे मराठे, सुभेदार, गड आला पण… अशा शब्दात अंगावर रोमांच उभे करणारे सुभेदार सिनेमाचं मोशन पोस्टर रिलिज झाले आहे.

या सिनेमात सुभेदार या चित्रपटात तान्हाजी मालुसरे आणि त्यांनी राखलेल्या सिंहगडाची रोमांचक कथा पहायला मिळणार आहे. तान्हाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अभिनेते अजय पुरकर हे दिसणार आहेत. तर अभिनेता चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे. मृणाल कुलकर्णी जिजाऊंची भूमिका साकारणार आहेत. जून 2023 ला सुभेदार सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची निश्चित तारीख अजून समोर आली नाही. दिग्पाल लांजेकरांच्या सुभेदार सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये