भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानं मोदींची तुलना केली रावणाशी, म्हणाले; “पंतप्रधान मोदी रावणाप्रमाणेच…”

मुंबई : (Subramnyam Swami On Narendra Modi) भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रावणाशी केली आहे. ते म्हणाले, रावणसारखे मोदी धार्मिक असल्याचा दावा करून मंदिरे नष्ट करत आहेत. यासंदर्भाचे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी करत पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
त्यांनी ट्विटमध्ये म्हटसं आहे की, “पंतप्रधान मोदी रावणाप्रमाणेच धार्मिक असल्याचा दावा करतात. असा दावा करून मंदिरे पाडण्याचा काम करत आहेत किंवा त्यावर ताबा मिळवत आहेत. उत्तराखंड आणि वाराणसीमध्ये हेच झालं आहे. आता मोदी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळवून पंढरपूरच्या पवित्र स्थळांना नष्ट करण्याची योजना बनवत आहे. हा नरसंहार रोखण्यासाठी आपण लवकरच मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचं स्वामी यांनी म्हटलं आहे”. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला असल्याचे बोललं जात आहे.
पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपूरमध्ये अहिल्याबाई होळकर आणि बायजाबाई शिंदे यांनी बांधलेली राम आणि कृष्ण ही दोन्ही मंदिरे तोडली जाणार असल्याचे बोलले जात आहे. यावरून भाजपचे माजी राज्यसभा खासदार नाराज असून त्यांनी कोर्टात जाण्याचा निश्चय केला आहे. या काॅरिडाॅरला शिवसेनेकडून देखील विरोध होताना दिसत आहे.