ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रशिक्षण

अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलचे यश

पुणे SSC Results | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेत आंबेगाव बु ॥ येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजने १०० टक्के निकालाची परंपरा सलग १९ व्या वर्षीही सातत्याने राखून घवघवीत सुयश संपादन केले. शाळेतील देशपांडे सिद्धीने ९६.२० टक्के गुण मिळवून प्रथम, मांगडे समृद्धी हिने ९६ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर शेंडकर श्रेया हिने ९५.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

१७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले असून, १७६ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. शाळेतील सर्व शिक्षकांनी दररोजच्या अभ्यासाबरोबर ऑनलाइन पद्धतीने त्याचबरोबर कोरोनानंतर शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन केल्याने त्याचबरोबर विविध परीक्षांचा सराव घेतल्याने आम्ही उत्तम प्रकारचे गुण मिळवू शकलो, असे विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले.

शाळेतील विद्यार्थ्यांनी १० वीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवून १०० टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणार्‍या आणि अभिनव ज्युनिअर कॉलेजमध्ये ११ वी ला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना ११ वी चे आणि १२ वी चे मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली. पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. यावेळी सेक्रेटरी सुनीता जगताप, सहसेक्रेटरी निर्मोही जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही अभिनव शाळेच्या प्रोत्साहनामुळे मिळवले उत्तुंग यश.

वडील अर्धांगवायूचे रुग्ण असतानाही अभिनव शाळेने फ्रीशिप दिल्याने माझे १० वी चे शिक्षण होऊ शकले आणि ९४ टक्के गुण मिळवू शकलो. त्याचबरोबर कोणताही क्लास नसताना शाळेतील शिक्षकांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि नेहमी प्रोत्साहन दिल्यामुळे उत्तुंग यश मिळवू शकलो, असे आंबेगाव येथील अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलच्या गुणवत्ता यादीमध्ये येऊन ९४ टक्के मिळवलेल्या वेदांत कुलकर्णीने आपल्या मनातील विचारांना मोकळी वाट करून देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये