ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

“…म्हणून तुम्ही उपमुख्यमंत्री झाला नाहीत”, सुधीर मुनगंटीवारांचा जयंत पाटलांवर निशाणा

मुंबई : विधानसभा अधिवेशनचा आज दुसरा दिवस आहे. भाजपाचे राहुल नार्वेकर यांचा विधानसभा अध्यक्षपदी विजय झाला. त्यानंतर आज बहुमत चाचणीतही फडणवीस-शिंदे सरकारचा विजय झाला आहे. यावेळी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटलांवर निशाणा साधला आहे. जयंत पाटील तुम्ही इकडून तिकडे गेला नाहीत, म्हणून उपमुख्यमंत्री झाला नाहीत, असा टोला मुनंगटीवारांनी लगावला आहे.

अभिनंदन विश्वसादर्शक प्रस्तावादरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये सत्ता गेल्याची वेदना आम्ही बघत होतो. मात्र, शिंदे आणि भाजपा सरकारची सत्ता आणण्यासाठी अजित पवारांनीही प्रत्यक्ष-अप्रत्य़क्षपणे मदत केली त्यामुळे त्यांचेही धन्यवाद, असा खोचक टोला देखील सुधीर मुनगंटीवारांनी लगावला आहे.

पुढे सुधीर मुनगंटीवारांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला. इकडून तिकडे गेल्याने कोणी पराभूत होत नाहीत. तुम्ही गेला नाहीत म्हणून उपमुख्यमंत्री झाला नाहीत. आता मनामध्ये पक्का विचार ठेवा. कधीतरी अशी उडी मारावी लागते. राष्ट्रवादीतील अर्धे लोक रात्री आमची भेट घेतात. कधी कोणी इकडे येईल तुमच्यासकट सांगता येत नाही, असा खोचक टोला मुनगंटीवारांनी जयंत पाटलांना लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये