ताज्या बातम्यामनोरंजन

सुकेशने दिल्या जॅकलिनला ‘व्हॅलेंटाइन डे’च्या खास शुभेच्छा, म्हणाला, “तिला माझ्याकडून…”

दिल्ली | अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं (Jacqueline Fernandez) 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) याच्यासोबतचं कनेक्शन असल्याच बोललं जात होत. सुकेश आणि जॅकलिनचे प्रायव्हेट फोटो जेव्हा व्हायरल झाले, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखर तिहार तुरुंगात आहे. आरोपी सुकेश चंद्रशेखर याची जेव्हा चौकशी झाली, तेव्हा जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही या दोन मोठ्या अभिनेत्रींची नावं समोर आली. सुरुवातीला झालेल्या चौकशीत जॅकलिनने सुकेशसोबतचं नातं साफ नाकारलं. मात्र ईडीने जेव्हा पुराव्यांसह प्रश्न विचारले, तेव्हा बऱ्याच गोष्टी समोर आल्या. जॅकलिन सुकेशच्या प्रेमात होती, हे नंतर सुकेशनेच स्पष्ट केलं. इतकंच नव्हे तर या दोघांचे प्रायव्हेट फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

या प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून अनेक खुलासे होत आहेत. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींशी सुकेशचे प्रेमसंबंध असल्याचं उघड झालं होतं. त्याने महागडे गिफ्ट देऊन तरुणींना जाळ्यात ओढलं होतं. आता ‘व्हॅलेंटाइन डे’मुळे सुकेश पुन्हा चर्चेत आला आहे.

सुकेशने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुकेशला दिल्लीतील एका कोर्टात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी जॅकलिन फर्नांडिसबरोबर रिलेशनशि असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सुकेशने जॅकलिन व्हॅलेंटाइन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, “तिला माझ्याकडून व्हॅलेंटाइन दिनाच्या शुभेच्छा द्या”.

जॅकलिनने केलेल्या आरोपांवर उत्तर देत सुकेश म्हणाला, “मला यावर काहीही बोलायचं नाही. हे सगळं बोलण्यामागे तिच्याकडे नक्कीच काहीतरी कारण असेल. जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता, तेव्हा तुम्ही त्याचं संरक्षण करता. त्यामुळे मला याबाबत काहीच बोलायचं नाही”.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये