‘समर क्वीन किंग प्रिन्स आणि प्रिन्सेस’ सौंदर्य स्पर्धा दिमाखात पडली पार, व्हिडीओ

पुणे : ‘द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स’ निर्मित आणि ‘अ ब क’ चित्रपटासह ‘द ट्रॅप’ सारख्या वेब सिरीज चे दिग्दर्शन केलेले सेलिब्रिटी दिग्दर्शक रामकुमार शेडगे प्रस्तुत ‘समर क्वीन किंग प्रिन्स आणि प्रिन्सेस’ या फॅशन शो चा जलवा शनिवारी उत्तर रात्रीपर्यंत रंगला. अभिनेत्री स्मिता गोंदकर, अभिनेते विजय पाटकर यांच्यासह गुरमीत कौर, अंजली आवटे, राहुल बोराटे, राहुल भंडारी, राष्ट्रसंचारचे संपादक अनिरुद्ध बडवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा फॅशन शो पुणे सोलापूर रोडवरील S4G हॉटेलच्या आलिशान शामियानामध्ये पार पडला.
पुणे सातारा जळगाव मुंबई ते अगदी गोंदिया चंद्रपूर पर्यंत अनेक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. विनोदी अभिनेते विजय पाटकर यांनी देखील आपल्या कुमारसदार अभिनयाने आणि अदाकारीने या फॅशन शोला चार चांद लावले त्यांनी स्वतः करत धमाल उडवून दिली परंतु अनेकांना आपल्या विनोदी शैलीत चिमटे घेत हा फॅशन शो अधिक रंगतदार केला. दैनिक राष्ट्रसंचार या फॅशन शो चे मीडिया प्रायोजक होते.
चार वर्षाच्या ज्युनिअर केजीच्या मुलापासून ते दहावीपर्यंतच्या मुला मुलींपर्यंतचा एक स्वतंत्र फॅशन शो राऊंड आयोजित करण्यात आला होता यामध्ये अनेक मुलांनी अतिशय आत्मविश्वासाने सहभाग नोंदवला.
मराठी आणि हिंदी चित्रपटातील विजय पाटकर, स्मिता गोंदकर, स्वाती कर्णीकर, संकेत मोरे, चित्रपट निर्माते प्रशांत कहाणे, राहुल भंडारी, अशा अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. परीक्षक म्हणून अभिनेत्री व मॉडेल गुर्मीत कौर मान, मिसेस इंडिया डॉ. अंजली आवटे, अभिनेता राहुल बोराडे यांनी काम पाहिले. त्याच बरोबर नक्षत्रचे अनुराधा गणेश तुम्मा, एस. फोर. जी हॉटेलचे संदीप कुंजीर, शिवाजी जावळे, ग्रूमिंग विनोद टेमगिरे, हेअर मेकअप पूजा काठमवार, श्रद्धा दराडे, सुप्रिया देशपांडे, क्लॉथ डिझाईनर सोमय्या पठाण, पोस्टर सुजय दंताळे, आकाश जाधव, नइम पठाण व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सोनी यांनी पाहिले.
राष्ट्रसंचार च्या विशेष अंकाचे प्रकाशन
या सौंदर्य स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रसंचारणे प्रकाशित केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन अभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते झाले तर अभिनेत्री स्मिता गोंदकर यांनी त्याचे अवलोकन केले. आपण स्वतः नवोदित असून देखील समाजातील नवोदित आणि सूचनात्मक गोष्टी पुढे आणण्यासाठी राष्ट्रसंचारने उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे असे उद्गार यावेळी अभिनेते पाटकर यांनी काढले.
