ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

ठरलं! ‘या’ दिवशी होणार शिवसेना-शिंदे गटाच्या याचिकेचा अंतिम फैसला!

नवी दिल्ली : (Supreme Court rebels MLA Date Final) विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली होती. त्यानंतर नोटीसीविरोधात आव्हान देत शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाशी निगडित एकूण सात प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहेत.

दरम्यान, सुनावणीसाठी घटनापीठाची स्थापना करण्याची गरज आसल्याचे सांगत या याचिका लांबणीवर टाकल्या होत्या. शिवसेनेची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर आज ठरलेल्या तारखेला म्हणजेच ११ जुलै रोजी प्रकरणावर सुनावणी घ्यावी, अशी विनंती केली होती. मात्र, ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने नाकारली आहे. पुढील सुनावणी नेमकी कधी होणार याबाबत न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलेलं नव्हतं.

परंतू रविवार दि. १७ रोजी सरन्यायाधीश एन.व्ही रमण्णा यांच्या नेतृत्वातील खंडपीठ येत्या २० जुलै रोजी शिवसेनेतील फुटीसंदर्भातील याचिकेवर सुनावणी घेणार आहे. अशी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार आणि विधानसभेत बदल घडवून आणणाऱ्या शिवसेनेतील फुटीच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमना, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश असलेल्या खंडपीठात या याचिकांवर सुनावणी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये