![सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचं अभिमानास्पद यश suryadatta group of institutes](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/suryadatta-group-of-institutes-780x470.jpg)
पुणे ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (HSC) शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. यात सूर्यदत्त कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९२.४१ टक्के, तर सूर्यदत्त पब्लिक स्कूलचा निकाल ९३.७९ टक्के लागला आहे. सायन्स, कला, वाणिज्य, एमसीव्हीसी व बायफोकल अशा सर्वच शाखेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत शाळेसाठी अभिमानास्पद कामगिरी केली.
यात सूर्यदत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा ९४.८९ टक्के, कला शाखेचा ९७.४६ टक्के तर वाणिज्य शाखेचा ८४.८८ टक्के निकाल लागला आहे. तसेच सूर्यदत्त पब्लिक स्कूलच्या विज्ञान शाखेचा ९७.१४ टक्के, कला शाखेचा ९५.४१ टक्के तर वाणिज्य शाखेचा ८८.८२ टक्के निकाल लागला आहे. यावेळी सूर्यदत्तचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया, प्राचार्य किरण राव, शैला ओक यांनी शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचे अभिनंदन केले.
सूर्यदत्त पब्लिक स्कूलच्या विज्ञान शाखेत अनुक्रमे अमोघ भागवत (९४.१७ टक्के), मंगेश गोसावी (९१.०० टक्के), सोहम लघाटे (९०.८३ टक्के), कला शाखेत शांभवी कुलकर्णी (९४.६७ टक्के), आस्था गांधी (९२.०० टक्के), रितिका देशपांडे (९०.६७ टक्के), वाणिज्य शाखेत वेदत्रयी खोडके (९२.१७ टक्के), सिद्धी ओक (८९.६७ टक्के) यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले.