“मोदी टेलिप्राॅम्पटरवर बोलतात आणि एकनाथ शिंदे…”, सुषमा अंधारेंचा खोचक टोला

कोल्हापूर | Sushama Andhare On Eknath Shinde – शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातून 7 प्रकल्प बाहेर गेले, लाखो लोकांचे रोजगार गेले. गुजरातला प्रकल्प नेऊन मुंबईला दुबळे करून गुजरातला ड्रीम सिटी करायचा प्रयत्न असल्याची टीका सुषमा अंधारेंनी केली आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये जातीचे राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केली आहे. त्या कोल्हापूरमध्ये महाप्रबोधन यात्रेत बोलत होत्या.
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, शिवसेनेतून अनेकजण आले गेले पण शिवसेनेला काही फरक पडला नाही. राज ठाकरे, भुजबळ यांनी शिवसेना संपवायचा कधी प्रयत्न केला नाही. तसंच मोदी टेलिप्राॅम्पटरवर बोलतात आणि एकनाथ शिंदे फडणवीसांनी दिलेल्या चिठ्ठ्यांवर बोलतात, असा खोचक टोला अंधारेंनी लगावला आहे. माझ्या उंचीवरूनही टीका केली गेली पण फडणवीस यांची उंची आणि वजनही माहीत आहे, पण फडणवीस यांनी नेमका कशाचा त्याग केला?, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
मी राष्ट्रावादीची कधीही सदस्य नव्हते, तरीही गुलाबराव पाटील म्हणतात मी राष्ट्रवादीतून आले. भाजपकडे स्वत:चं असं काय होतं? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लेकरांना मांडीवर घेऊन भाजपनं त्यांना मोठं केलं. खोके शब्द उच्चारला तर कायदेशीर कारवाई करणार असं म्हटलं जातं, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.