ताज्या बातम्यामनोरंजन

लग्नानंतर साडेचार महिन्यांमध्येच स्वरा भास्कर झाली आई? ‘त्या’ ट्विटनं वेधलं सर्वांचं लक्ष

मुंबई | Swara Bhaskar – बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) ही नेहमी काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच स्वरा भास्करनं फहाद अहमदशी रजिस्टर पद्धतीनं लग्न केलं. ही बातमी तिनं एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली होती. यानंतर स्वराला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. अशातच आता स्वरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्वरा लग्नानंतर अवघ्या साडेचार महिन्यांमध्ये आई झाली असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे तिला पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजुदास यांनी एक ट्विट करत स्वरा भास्करला ट्रोल केलं आहे. त्यांनी हे ट्विट करताचा अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. ही स्वराची वैयक्तिक बाब असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी महंत राजुदास यांच्या ट्विटवर कमेंट करत स्वराचं अभिनंदन केलं आहे.

महंत राजुदास यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “स्वरानं साडेचार महिन्यांनी बाळाला जन्म देऊन वेळेच्या आधी काम पूर्ण करणाऱ्या गडकरीजींना आरसा दाखवला आहे.” महंत राजुदास यांनी हे ट्विट करताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. पण, स्वरानं अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

या ट्विटवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त करू लागले आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “तुम्ही देवाचं ध्यान करा, स्वराच्या गर्भावस्थेबाबत चिंता करू नका. हे तुम्हाला शोभत नाही.” तर दुसऱ्यानं म्हटंल, “तुम्ही महंत असून देखील अशा अफवा पसरवता. तुम्हाला लाज कशी वाटत नाही.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये